पालकमंत्री उदय सामंत रात्रीपासूनच उतरलेत मैदानात:पहाटे ४ वाजल्यापासून जिल्हाधिकारी यांच्या सोबत चक्रीवादळाची आढावा बैठक

सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत पहाटे चार वाजल्यापासून मैदानात उतरले आहेत ओरोस येथे जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी व जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्यासोबत चक्रीवादळा संदर्भात महत्वपूर्ण बैठक घेतली तौत्के मध्यरात्री वेंगुले समुद्र किनारी पाहणी करत आढावा घेतला सिंधुदुर्गातातील आपत्कालीन विभागाशी पालकमंत्री उदय सामंत रात्रीपासून संपर्कात आहेत रात्रभर न झोपता पहाटे ३ ते ४ वाजल्यापासून आढावा घेत आहेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने प्रशासनाने सज्ज राहावे व मनुष्यबळ तसेच साधन सामुग्री तयार ठेवावी असे आदेश कालच उदय सामंत यांनी प्रशासनास दिले हाेते
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button