
आताच्या ताज्या स्थितीनुसार, तौते चक्रीवादळ सिंधुदुर्गातल्या समुद्रात दाखल
आताच्या ताज्या स्थितीनुसार, तौते चक्रीवादळ सिंधुदुर्गातल्या समुद्रात दाखल झालं असुन या चक्रीवादळाने आता अतितीव्र रूप धारण केल्याचं भारतीय हवामान खात्याने म्हटलं आहे. सिंधुदुर्गात किनारपट्टी भागात वेगाने वारे वाहू लागले असून या वेग ताशी १३०-१४० ते १५५ किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विजयदुर्ग किनाऱ्यावर २.३ मीटर उंचीच्या लाटा उसळल्याची नोंद झाली आहे.
ताउक -ते चक्रीवादळ दुपारी १२ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर येथील समुद्रातुन विजयदुर्गच्या दिशेने कूच आहे.
वादळाचा प्रवासाचा वेग कमी आहे मात्र त्याचा जोर वाढतोय
राजापुराला किनारपट्टीवरील गावांना चक्रीवादळाचा फटका बसायला सुरुवात झाली असून पाऊस, वारे यांचा जोर आहेरत्नागिरीमध्ये शहरात पावसाला सुरुवात झाली असून जोरदार वारेही वाहू लागले आहेत
www.konkantoday.com




