कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक ती सर्व उपाययोजना -पालकमंत्री अनिल परब
रत्नागिरी : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्याच्या दृष्टीने गुरुवारी झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासमवेत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हेही होते.
यावेळी पालकमंत्री परब यांनी जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या लसीकरणाची माहिती दिली. सध्या लसीचा साठा अपुरा पडत असल्याने सध्या १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण थांबविण्यात आले आहे. ४५ वर्षांवरील व्यक्तींचा दुसरा डोस राहिला असेल, त्यांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे.
www.konkantoday.com