सर्वाधिक नफा कमवणाऱ्या कंपनींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ‘कोव्हिशिल्ड’ लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचा सामावेश
कॉर्परेट कंपन्याच्या व्यवहारासंदर्भात माहिती ठेवणाऱ्या कॅपिटलाइनने प्रकाशित केलेल्या नव्या अहवालानुसार सन २०१९-२० मध्ये भारतातील ४१८ भारतीय कंपन्यांनी पाच हजार कोटींहून अधिक रक्कमेचा एकूण व्यापार केलाय. यामध्येही सर्वाधिक नफा कमवणाऱ्या कंपनींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ‘कोव्हिशिल्ड’ ही करोना प्रतिबंधक लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचा सामावेश आहे. भारतामध्ये करोनाच्या दोन लसींच्या आप्तकालीन वापरासाठी परवानगी देण्यात आलीय यामध्ये , ‘कोव्हिशिल्ड’ बनवणाऱ्या सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाला आणि ‘कोव्हॅक्सिन’ बनवणाऱ्या भारत बायोटेकचा सामावेश आहे. लाइव्ह मिंटने दिलेल्या वृत्तानुसार सीरमने पाच हजार ४४६ कोटींच्या विक्रीच्या मोबदल्यात दोन हजार २५१ कोटींचा निव्वळ नफा कमवला आहे.
www.konkantoday.com