
उपनगरीय लोकल, मेट्रो आणि मोनोरेलमधील प्रवासावर घालण्यात आलेले निर्बंध तूर्त तरी कायम राहणार
राज्यातील करोनास्थिती अद्याप सुधारलेली नसल्यामुळे उपनगरीय लोकल, मेट्रो आणि मोनोरेलमधील प्रवासावर घालण्यात आलेले निर्बंध तूर्त तरी कायम राहणार आहेत. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांनाही सध्या याबाबत दिलासा दिला जाऊ शकत नाही, अशी भूमिका राज्य शासनाने मंगळवारी उच्च न्यायालयात मांडली. त्याची दखल घेत न्यायालयानेही सहकारी बँक कर्मचारी संघटनेची लोकल प्रवासास मुभा देण्याची मागणी फेटाळली.
www.konkantoday.com