रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकार आणि प्रशासनाच यश, अशी दुटप्पी भूमिका सरकार आणि प्रसार माध्यमं कशी घेऊ शकतात?,”महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांचा सवाल

0
61

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर राज्य सरकारने लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला होता. लॉकडाउनचे परिणाम आता दिसून येत असून, रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईतील परिस्थितीही नियंत्रणात आलेली असून, मुंबई मॉडेलचं कौतुक होत आहे. मुंबई आणि राज्यातील परिस्थितीवर समाधान व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी सवाल उपस्थित केला आहे.संदीप देशपांडे यांनी ट्विट केलं असून, या ट्विटमध्ये करोना परिस्थितीवरून सरकारला लक्ष्य केलं आहे. “आज महाराष्ट्रातील रुग्ण संख्या कमी होते आहे. चांगली गोष्ट आहे त्याच श्रेय मुंबई मॉडेल, मुख्यमंत्री, पालकमंत्री सगळेच घेत आहेत. म्हणजे रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकार आणि प्रशासनाच यश, अशी दुटप्पी भूमिका सरकार आणि प्रसार माध्यमं कशी घेऊ शकतात?,” असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here