
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विषयांबाबत आमदार उदय सामंत व पालकमंत्री अनिल परब यांची चर्चा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विषयांबाबत रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. ऍड. अनिल परब ह्यांची भेट घेतली. त्यासमयी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी मा. ना. ऍड. अनिल परब ह्यांच्याशी रत्नागिरी मधील लसीकरण, टाळेबंदी, रुग्णवाहिका, महिला कोविड केंद्र, ऑक्सिजन प्लांट, प्लास्मा, खरीप हंगाम, बसस्थानकांचे नूतनीकरण आदि विषयांवर सविस्तर चर्चा केली.आज दुपारी साडेतीन वाजता आमदार उदय सामंत यांची पत्रकार परिषद आहे त्यामध्ये काही निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे
www.konkantoday.com