नागपूरच्या धर्तीवर रत्नागिरी येथील महिला रुग्णालयामध्ये एका व्हेंटिलेटरवर २ रुग्ण ठेवण्याचा प्रयोग यशस्वी

0
54

रत्नागिरी येथील आरोग्य यंत्रणेने आपत्कालीन परिस्थितीमध्ये एका व्हेंटिलेटरवर २ रुग्ण ठेवण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. मात्र या रुग्णांच्या प्रकृतीची समस्या समान असणे आवश्‍यक आहे. फिजिशियननी दोन्ही रुग्णांची समान परिस्थिती पाहून नागपूरच्या धर्तीवर येथील महिला रुग्णालयामध्ये हा प्रयोग करण्यात आला आहे.
नागपूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा प्रयोग करण्यात येत आहे. त्या धर्तीवर जिल्ह्यात एका व्हेंटिलेटरवर दोन रुग्ण ठेवण्याचा प्रयोग येथील महिला रुग्णालयात सुरू आहे. आपत्काली परिस्थितीचा विचार करून अशा प्रकारे रुग्णांना जीवदान देण्याचा हा प्रयत्न आहे.
अत्यवस्थ रुग्णांचे जीव वाचवताना व्हेंटिलेटरची गरज असते. आपत्कालीन परिस्थितीत एका व्हेंटिलेटरवर दोन समान प्रकृती असणाऱ्या रुग्णांवर हा प्रयोग करण्यात आला आणि तो आरोग्य कर्मचाऱ्यांनी यशस्वी केला आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here