माळरानावर लागलेल्या वणव्यात बेर्डेवाडी धरण प्रकल्पाच्या कालव्याच्या १००पाईपसह साहित्य आगीत जळून खाक

0
37

लांजा तालुक्यातील वेरवली खुर्द कातळवाडी येथील माळरानावर लागलेल्या वणव्यात रस्त्याच्या शेजारी एकत्रित ठेवलेल्या बेर्डेवाडी धरण प्रकल्पाच्या कालव्याच्या १००पाईपसह साहित्य आगीत जळून खाक झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. येथील माळरानाला वणवा लागल्यानेच हे पाईप व अन्य साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. धरण प्रकल्पाच्या व्यवस्थापकांनी रविवारी उशिरा लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेत लाखो रुपयांहून अधिकचे नुकसान झाले.
वेरवली रामवाडी- वेरवली खुर्द-पडवण रस्त्याच्या शेजारी वेरवली खुर्द कातळवाडी येथील माळरानावर बेर्डेवाडी धरणाच्या कालव्याचे एच. डी. पी. ई. पाईप तसेच अन्य साहित्य ठेवण्यात आले होते.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here