माझी रत्नागिरी माझी जबाबदारीजिल्ह्यात 7 लाख 98 हजाराहूंन अधिक नागरिकांची तपासणी

0
44

माझी रत्नागिरी माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात
गृह भेटीतून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या मोहिमेत आतापर्यंत 7 लाख 98 हजार 856 जणांची तपासणी करण्याचे काम पूर्ण झाले असून यातून 597 पॉझिटिव्ह
रुग्ण आढळले आहेत. यातील 230 जणांना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 770 पथकांनी तपास मी कामाला सुरुवात केली होती आता सध्या 1308 पथके घरोघरी भेटी देऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करत आहेत. या
अंतर्गत 2 लाख 26 हजार 414 घरांना भेटी देण्यात आल्या यातून एकूण 2 लाख 41हजार 446 कुटुंबातील 7 लाख 98 हजार 856 व्यक्तींची तपासणी करण्यात आली.
या भेटीदरम्यान नागरिकांची ऑक्सीमीटरवर ऑक्सीजन पातळी तपासण्यासह त्यांच्या शरीराचे तापमान तपासणे तसेच सहा मिनिटांची वॉक टेस्ट घेणे आदी तपासण्यांचासमावेश आहे.
या तपासणी दरम्यान 33477 घरे बंद असल्याचे आढळून आले आहे यांची पातळीचालण्याच्या तपासणीनंतर 95 पेक्षा खाली गेली अशांची एकूण संख्या 628 इतकीआढळली आहे तर ताप सर्दी खोकला असणाऱ्या एकूण व्यक्तींची संख्या 1031 इतकी होती.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here