चिपळूण शहरात हेल्मेट न वापरणाऱ्या २००हून अधिक जणांवर दंडात्मक कारवाई

0
34

चिपळूण नगर परिषद हद्दीत हेल्मेट सक्तीचा आदेश दिला आहे. त्यानुसार रविवारी चिपळूण शहरातील चौकाचौकात २००हून अधिक जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
काही वर्षांपूर्वी चिपळूण शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली होती. मात्र, काही दिवसातच त्याची अंमलबजावणी थांबली होती. त्यानंतर येथे हेल्मेट सक्तीची कारवाई केली जात नव्हती. केवळ महामार्गावर त्याबाबतची कारवाई केली जात होती. त्यामुळे शहरातील नागरिक हेल्मेटचा वापर फार करत नव्हते. मात्र, आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिश्रा यांनी रत्नागिरी बरोबरच चिपळूण येथेही हेल्मेट सक्ती केली आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here