रत्नागिरीत साकारतेय आधुनिक कोविड सेंटर प्रसिध्द उद्योजक अनुप सुर्वे यांचा पुढाकार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभर कहर माजविला असताना शासन आणि प्रशासन त्यांचे योगदान देत आहे मात्र लोकसंख्या आणि बाधित रुग्णाची वाढती संख्या यामुळे प्रशासनाला उद्योजक, सामाजिक संस्था यांचे सहकार्य आवश्यक बनले आहे. रत्नागिरीतही वाढती रुग्णसंख्या पहात शासकीय सुविधांसोबत जनतेच्या सहकार्याची गरज पडत आहे. रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक मा. मोहितकुमार गर्ग यांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उद्योजक, सामाजिक संस्थांना आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रत्नागिरी एम आय डी सी येथे एम के उद्योग समूहाचे संचालक आणि प्रसिद्ध उद्योजक श्री. अनुप सुर्वे यांचे रत्नागिरी, ठाणे,नवी मुंबई येथे उद्योग आहेत त्या समूहातील रत्नागिरी मधील सुमा कंपनी च्या जागेत कोव्हिड केअर सेंटर उभारण्यास पुढाकार घेतला आहे.
हे कोव्हिड केअर सेंटर सध्या 60 ते 70 बेडचे असून एम आय डी सी मिरजोळे रत्नागिरी येथे लवकरच सुरू होत आहे. या सेंटरचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये DCCC (डेडिकेटेड कोव्हिड केअर सेंटर) म्हणूनही सुविधा मिळणार आहे. ज्यात आवश्यकतेनुसार ऑक्सिजन बेडस आणि अन्य आवश्यक सुविधा असणार आहेत.
श्री. अनुप सुर्वे यांनी याआधीही कोकण आणि रत्नागिरीसाठी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. मात्र कायम प्रसिद्धीपासून दूर रहात सामाजिक बांधिलकी जपली आहे. या माध्यमातून त्यांनी अनेक उद्योजकांसमोर चांगला आदर्श ठेवला आहे. पोलीस अधीक्षक मा. मोहितकुमार गर्ग यांनी अनुप सुर्वे यांचं कौतुक करत बाकी उद्योजकांनीही अशा प्रकारचे सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
हे कोव्हिड केअर सेंटर प्रत्यक्षात येण्यासाठी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते जाणीव फाउंडेशन चे अध्यक्ष श्री महेश गर्दे यांनी महत्वाची भूमिका बजावली. पोलीस प्रशासन आणि उद्योजक यांचा सुसंवाद साधून हे कोव्हिड केअर सेंटर प्रत्यक्षात येण्यासाठी मेहनत घेतली आहे. तसेच त्याबाबत आवश्यक गोष्टींची पूर्तता केली.महेश गर्दे यांनी यासोबतच कोरोना योध्याची भूमिका चोख बजावत शासकीय कोविड सेंटरमध्ये रुग्णसेवा करीत आहेत. रुग्णांना समूपदेशन, बेडची व्यवस्था करणे, आपत्कालीन मदत यासह पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मित्र म्हणूनही उत्तम कामगिरी केली आहे. प्रशासन आणि जनता यामधील दुवा हीच महेश गर्दे यांची ओळख आहे. अशा गौरवोद्गाराने पोलीस प्रशासनाने महेश गर्दे यांचेही कौतुक केले आहे.
या सेंटर मुळे पोलीस प्रशासन अधिकारी कर्मचारी तसेच त्यांचे नातेवाईक आणि आरोग्य यंत्रणेमध्ये सामाजिक काम करणाऱ्या व्यक्ती यासंबंधीत येणाऱ्या रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button