
काँग्रेसच्या नगरसेवकांनी बहिष्कार घातल्याने चिपळूण पालिकेचीऑनलाईन सभा रद्द
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासाठी रुग्णवाहिका व अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी नगरपरिषदेची तातडीची विशेष सभा शुक्रवारी आयोजित केली होती. ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या या सभेवर काँग्रेसच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकत सभा पुढे घेण्याची मागणी केली. त्यामुळे ही सभा रद्द करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी नगर परिषदेतर्फे शहरातील नागरिकांसाठी रुग्णवाहिका पुरवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. याशिवाय तंत्र व उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनीही तशा सूचना केल्या होत्या. त्याची दखल घेत नगरपरिषदेने रुग्णवाहिका व फवारणी साहित्य खरेदी करणे, गोवळकोट येथील नाल्यावर स्लॅबमोरी उभारणे आणि शिवनदीतील गाळ उपशाबाबत आर्थिक व प्रशासकीय मंजुरीबाबतचा प्रस्ताव या सभेत ठेवला होता.
www.konkantoday.com