आदरातिथ्य क्षेत्रास औद्योगिक दर्जाच्या विशेष सवलती राज्य शासनाचा निर्णयाचा लाभ घेण्याचे आवाहन
आदरातिथ्य क्षेत्र पर्यटन व्यवसायातील मुख्य सेवा उद्योग आहे. हे क्षेत्र महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात महत्वाची भूमिका बजावत आहे. या क्षेत्रातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असते. त्याचप्रमाणे हा व्यवसाय परकीय चलन मिळवून देण्यास परिणामकारक साधन आहे. कोविड-१९ चा या क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे या क्षेत्राला पुनर्जीवित करण्यासाठी शासनाने वीज दर, वीज शुल्क, मालमत्ता कर, पाणीपट्टी, विकास कर, वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक आणि अकृषी कराची आकारणी औद्योगिक दराने करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
हॉटेल व्यवसायात किमान मूलभूत दर्जा पूर्ण करणाऱ्यांना औद्योगिक दराने कर /शुल्क आकारण्यात येणार आहे. आदरातिथ्य क्षेत्रातील घटकांना या योजनेचा फायदा घ्याचा असेल तर पर्यटन संचालनालय यांचेकडे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याची स्थळ पाहणी केली जाईल. किमान मूलभूत दर्जा पूर्ण होत असल्यास त्यांना नोदणी प्रमाणपत्र दिले जाईल. आदरातिथ्य क्षेत्रधारकांची नोंदणी पर्यटन संचालनालयाकडे करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज आणि त्या सोबतचे कागदपत्र करणे आवश्यक आहे. हे अर्ज करण्याचीची कार्यपद्धती ऑनलाइन आहे. ऑनलाइन अर्ज www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर करता येईल किंवा https://docs.google.com/forms/d/102pqZqSVF_LkQWFYTCcIlIqGopWyf-MHiGjGRrJfFFw/ लिंक वर क्लिक करून अर्ज करण्याचे आवाहन हनुमंत हेडे उपसंचालक (पर्यटन) पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग नवी मुंबई यांनी केले आहे. पर्यटन व्यवसायात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या आदरातिथ्य सेवेला उद्योगाचा दर्जा दिल्याने पर्यटन संचालनालय यांच्याकडे नोंदणी करणाऱ्या उद्योजकांना निश्चितच कोविड-१९ च्या परिस्थितीत पुनर्जीवित होण्यास मदत होईल. त्याचा फायदा पर्यटन उद्योगाला होणार असल्याचे हेडे म्हणाले.
www.konkantoday.com