
कोकणनगर लसीकरण केंद्रात प्रवीण देसाई यांच्याकडून कंपार्टमेंट
रत्नागिरी ः कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी आता सर्वच लसीकरण केंद्रावर रांगा दिसू लागल्या आहेत. या केंद्रावरील वाढती गर्दी लक्षात घेऊन सामाजिक भान राखत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण देसाई यांनी कोकणनगर येथील केंद्रात कर्मचार्यांचे सुरक्षेसाठी पारदर्शक कंपार्टमेंट स्वखर्चाने करून दिले. ते गेले अनेक दिवस लसीकरण केंद्रात नागरिकांना मदत करण्याचे काम करत आहेत. या केंद्रातील कर्मचारी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी कंपार्टमेंट दिले. या वेळी नगरसेवक उमेश कुळकर्णी, नितीन गांगण, राजेश नेने, ज्येेष्ठ नागरिक दिलीप भाटकर, केंद्रावरील डॉ. पाटील, सौ. भाटकर आदी उपस्थित होते. या सुविधेबद्दल लसीकरण केंद्रावरील कर्मचार्यांनी समाधान व्यक्त केले.
www.konkantoday.com




