रत्नागिरीत बाजारात गर्दी करणार्या नागरिकांची अँटिजन टेस्ट सुरु
गेले काही दिवस कडक नियमावली केली असतानादेखील मोठ्या प्रमाणावर नागरिक बाजारात फिरत आहेत दुकान उघडण्यास बंदी असूनही रत्नागिरी शहरातील बाजारपेठ ,धनजी नाका मच्छीमार्केट जयस्तंभ व अन्य परिसरात काहीअर्धे शटर उघडून काही जण व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या यानंतर काल प्रशासनाने दुकानदारांवर कारवाई केली होती तरीदेखील पाठ फिरताच काहीजणांकडून व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न होत असतो त्यामुळे खरेदीसाठी नागरिक बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत असल्याचे पाहून आज गोखले नाका परिसरात अशा फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करुन त्यांची अँटिजन टेस्ट सुरू केल्याने खळबळ उडाली आहे या पथकांकडून अनेकांच्या अँटिजन टेस्ट सुरू आहेत
www.konkantoday.com