
पुणे-बंगळुरु महामार्गावर ऑक्सिजन टँकर लिक
पुणे-बंगळुरु महामार्गावर ऑक्सिजन टँकर लिक झाला आहे. हा टँकर कोल्हापुरच्या दिशेला जात होता. टँकरमध्ये जवळपास 10 मेट्रिक टन ऑक्सिजन साठा असल्याची शक्यता आहे. साताऱ्यातील वाळेफाटा परिसरात हा ऑक्सिजन टँकर उभा करण्यात आला आहे. घटनास्थळी सातारा पोलीस दाखल झाले आहेत. तसेच सातारा जिल्हा प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. लिकेज बंद करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. पण जवळपास अर्धा तास ते 45 मिनिटे टँकरमधील लिकेज सुरु होतं. त्यानंतर प्रशासनाचं काम सुरु झाले
www.konkantoday.com