कोरोना विरोधाच्या लढ्यात आता पोलिसही उतरले,लोकांच्यात जनजागृतीसाठी माेहीम
नेहमी कायद्याच्या अंमलबजावणीत पुढे असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस दलाने आता आरोग्य जागृततेसाठी पुढाकार घेतला आहे त्यानी संशयित बाधितांना शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. रत्नागिरी पोलिसांनी हा अनोखा उपक्रम सुरू केला असून आतापर्यंत दहा हजारांहून अधिक नागरिकांची घरी जाऊन शरीराचे तापमान, प्राणवायू पातळी तपासली.
या तापसणीतून प्राणवायू पातळी कमी असलेले सुमारे ४० संशयित सापडले असून आरोग्य विभागाच्या मदतीने या व्यक्तींची चाचणी करून घेतली.
जिल्ह्यचे पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागात करोनाची लक्षणे असल्यास चाचणीद्वारे निदान करून घेण्याचा कल नाही.बाब हेरून शासनाने लागू के लेल्या कठोर र्निबधांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासह स्थानिक यंत्रणांना सोबत घेत दत्तक गाव योजना पोलिसांनी सुरू केली. या योजनेत ३० गावांची जबाबदारी त्या-त्या विभागातील अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली. अधिकाऱ्यांनी वाटून दिलेल्या गावांमधील प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक व्यक्तीचे तापमान, प्राणवायू पातळी मोजावी, हे अपेक्षित आहे.
या तपासणीसोबत लसीकरणासाठी जनजागृती करणे, लसीकरणाबाबत नागरिकांचे गैरसमज दूर करणे, गावकऱ्यांच्या सहकार्य-समानव्यातून विलगीकरण केंद्रे उभारणे आदी उद्देश या उपक्रमामागे आहेत, असेही गर्ग यांनी सांगितले.
www.konkantoday..com