असहाय बालकांना बेकायदेशीररीत्या दत्तक देण्याचे किंवा त्यांची विक्री करण्याचे प्रयत्न ,महिला व बालकल्याण विभागाचा इशारा
करोनामुळे आईवडिलांचे निधन झाले आहे. मूल दत्तक द्यायचे आहे,’ अशा संदेशांचे पेव सध्या समाजमाध्यमांवर फुटले आहे. असहाय बालकांना बेकायदेशीररीत्या दत्तक देण्याचे किंवा त्यांची विक्री करण्याचे प्रयत्न होत असल्याचे समोर आले आहे. या घटनांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, अशा समाजकंटकांवर थेट गुन्हा नोंदवण्यासह कठोर कारवाई करण्याचा इशारा महिला व बालकल्याण विभागाने दिला आहे.
www.konoantday com