
नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे बंड्या साळवी म्हाडाध्यक्ष आ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज अर्ज भरणार
रत्नागिरी येथील नराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी पाचव्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही. शिवसेनेकडून बंड्या साळवी हे म्हाडाध्यक्ष उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज १० डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूक बहुरंगी होण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेबरोबर भाजप, राष्ट्रवादी पुरस्कृत शहर विकास आघाडी, कॉंग्रेस आणि मनसे हे आपापले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार आहेत. त्या व्यतिरिक्त काही प्रतिष्ठीत नागरिकांचे प्रतिनिधीत्व करणारे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या विचारात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास ४ नोव्हेंबरला सुरूवात झाली असून उमेदवार निश्चित नसल्याने एकही अर्ज आलेला नाही.
www.konkantoday.com