सेवेतील आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याने आरोग्य यंत्रणेत भीतीचे वातावरण.
रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी ५०० कोरोना रुग्ण मिळतआहेत.त्यामानाने बेड्स संख्या कमी पडत आहे.जिल्हा प्रशासन रुग्णसंख्येच्या मानाने सुव्यवस्थित आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करीत असतानाच आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच कोरोना प्रादुर्भाव झाल्याने इतर आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
कोरोना महामारीत जीव धोक्यात घालून अनेक कर्मचारी काम करीत आहेत.रुग्ण संख्येच्या मानाने अपुरा कर्मचारी वर्ग असतानाही या कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.अपुऱ्या सोयींमुळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणारा मनस्ताप,बेड्स उपलब्ध न झाल्यास होणारी झुंडशाही त्यातच या कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याने नवे संकट निर्माण झाले आहे.
कामाचे तास बंधनकारक केल्याने अनेक कर्मचारी स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता सेवा बजावत आहेत.त्यातच काल सुमारे ६ जणांना तर आज दुपार अखेर नव्याने ११ जणांना कोरोना लागण झाल्याचे रुग्णालय परिसरात चर्चिले जात आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये असाच प्रादुर्भाव वाढल्यास भविष्यात कोरोना विरोधी लढत कशी द्यायची असा सवाल आरोग्य यंत्रणेत पडला आहे. चर्चेअंती या आरोग्य कर्मचाऱ्यांना सरंक्षण विषयक सुविधा कमी प्रमाणात मिळत असून वापर केलेल्या चीजवस्तू फेकल्यावर नव्याने उपलब्धतेत विलंब होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
www.konkantoday.com