बारावीच्या परीक्षेबाबत अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने हे विद्यार्थी संभ्रमात, दहावी पास विद्यार्थ्यांच्या,प्रवेशाचा प्रश्नही गंभीर होणार

0
30

कोरोना विषाणू कोविड-१९ मुळे २०२०-२१ या शैक्षणिक सत्रातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय एप्रिल २०२१ मध्ये घेण्यात आला. मात्र, बारावीच्या परीक्षेबाबत अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने हे विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. शिवाय दहावीच्या १७ लाख विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्यात आल्याने पुढे त्यांच्या प्रवेशाचा प्रश्नही गंभीर होणार आहे. दहावीनंतर प्रवेशासाठी केवळ नऊ लाख विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्याची व्यवस्था असल्याने उर्वरित विद्यार्थ्यांचे सरकार करणार काय, असा प्रश्न शिक्षण तज्ज्ञ तथा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विद्वत परिषद सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनी उपस्थित केला आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here