भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर करोनाविरोधातील लढ्यात उतरला
करोना संकटाचा सामना करत असताना सध्या देशात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर करोनाविरोधातील लढ्यात मैदानात उतरला आहे. सचिनने मिशन ऑक्सिजनसाठी तब्बल एक कोटी रुपयांची मदत केली आहे.
सचिन तेंडूलकरने मिशन ऑक्सिजन या मोहिमेसाठी १कोटी रुपयांची मदत केली आहे. २५० उद्योजक तरूणांनी सुरू केलेल्या या मोहिमेत सचिनने सहभाग घेतला आहे.
www.konkantoday.com