
रत्नागिरी जिल्ह्यात १३ नव्या अॅम्ब्युलन्स लवकरच दाखल हाेणार-ना .उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यात १३ नव्या अॅम्ब्युलन्स लवकरच दाखल होतील. त्या खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.अशी माहिती नामदार उदय सामंत यांनी दिली .त्यातील १० अॅम्ब्युलन्स या जिल्हा परिषदेकडे वर्ग केल्या जाणार आहेत. एक जिल्हा रुग्णालयासाठी दिली जाणार आहे. दोन कार्डिअॅक अॅम्ब्युलन्स असून त्यातील एक रत्नागिरीसाठी एक चिपळूणसाठी उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचेही ना सामंत यांनी सांगितले.
जिल्ह्यात येणार्यांची टेस्ट केली जात आहे. त्याचप्रमाणे मुंबई व अन्य ठिकाणाहून येणार्यांना १४ दिवस क्वॉरंटाईन केले जाणार आहे. या सर्वांसह गृह विलगीकरणामध्ये असणार्यांच्या हातावर शिक्का मारला जाणार असल्याचे ना. सामंत यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com