कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा या दोन्ही लशी भारतीय कोरोना व्हेरियंटवर प्रभावी
देशात कोरोना लसीकरण जोमात सुरू असताना चांगली बातमी समोर आली आहे. सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत असली तरी, लसीकरणाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. भारताच्या लसीकरण मोहीमेत सीरम इंन्स्टीट्युटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिनचा सामावेश आहे. या दोन्ही लशी भारतीय कोरोना व्हेरियंटवर प्रभावी आहेत. लसीकरणानंतर संसर्ग झाल्यास सौम्य लक्षणं दिसून येतात. एकीकृत जैवविज्ञान संस्थेने याविषयीच्या अभ्यासाच्या प्राथमिक निष्कर्षावर हा अहवाल दिला आहे.
www.konkantoday.com