नामदार उदय सामंत यांनी जातीने लक्ष घातल्याने स्टॅन्डर्ड अपार्टमेंटमधील रहिवाशांची पाण्याची गंभीर समस्या सुटली

रत्नागिरी येथील स्टँडर्ड अपार्टमेंटमध्ये काेविड लढ्यात लढणार्‍या डॉक्टरांचे निवासस्थानात असलेल्या इमारतीत पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता सात दिवस नगरपरिषदेचा पाणीपुरवठा होत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली होतीयाबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत नामदार उदय सामंत यांनी तातडीने स्वत लक्ष घालून संबंधिताना तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे कार्यवाही होऊन या इमारतीतील रहिवाशांना आज नगरपरिषदेचा पाणीपुरवठा सुरू झाला आहे याबाबत या स्टॅंडर्ड अपार्टमेंट रहिवाशांच्याच्यावतीने आमदार उदय सामंत यांचे खासआभार मानले आहेत ते इतर महत्त्वाच्या कामात व्यस्त असतानादेखील नामदार उदय सामंत यांनी याबाबत दखल घेतल्याने तसेच अपार्टमेंटला पाणी मिळवून दिल्याने एकापरीने त्यानी कोरोना योद्धात लढा देणार्‍या डॉक्टराना बळ दिल्याची भावना या इमारतीत राहणार्‍या डॉक्टरानी व्यक्त केली आहे
रत्नागिरी येथील परकार हॉस्पिटलजवळील स्टँडर्ड अपार्टमेंटमध्ये मेनरोडच्या नळपाणी पाईपलाईनचे काम झाल्यानंतर पाणीपुरवठा बंद झाला होता त्यावेळी नगरसेवक राजन शेटय़े यांनी पुढाकार घेऊन या इमारतीला टँकरने पाणी पुरवठा केला होता त्यातच इमारतीच्या आवारातील विहीर आटल्याने व नगरपरिषदेचा पाणीपुरवठा होत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती
या इमारतीत कोरोना सेवा बजावणारे चार डॉक्टर होते तसेच काही कोरोना रूग्णही राहात होते मात्र मेन लाईन मधून प्रॉब्लेम झाल्याने या इमारतीला सात दिवस नगरपरिषदेचा पाणीपुरवठा होत नव्हता याबाबतचे वृत्त उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कळल्यावर त्यानी तातडीने याची दखल घेतली त्यांनी संबंधितांना कार्यवाही करण्याच्या जातीने सूचना केल्या त्यानंतर नगराध्यक्ष बंडय़ा साळवी यांनी देखील पुढाकार घेऊन पाणी विभागाच्या कर्मचा यांना तेथे तातडीने पाठवले व मुख्य जलवाहिनीची गळती बंद केली तसेच इमारतीचे पाईपलाईन बदलण्यासाठी चे एस्टिमेट पाणी विभागाने काल रहिवाशांना दिले त्याप्रमाणे रहिवाशांनी इस्टीमेटप्रमाणे सामान दिल्यानंतर नगरपरिषदेच्या पाणी विभागाने तातडीने कार्यवाही करत ही पाईपलाईन जोडून दिली त्यामुळे आज स्टँडर्ड अपार्टमेंटमधील लोकांना आठ दिवसानी नगरपरिषदेचे पाणी उपलब्ध होऊ शकले आहे त्यामुळे या अपार्टमेंटमधील रहिवाशांची पाण्याची गंभीर समस्या उच्च तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी जातीने दखल घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यामुळे या इमारतीतील रहिवाशांनी सामंत यांचे मन पूर्वक आभार मानले आहेत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button