
बँकेतील कर्मचार्यांना लसीकरण त्वरित करावे- अनिकेत पटवर्धन
रत्नागिरी– कोरोना महामारीच्या कठीण काळात बँकेतील कर्मचारी कोरोना योद्ध्याप्रमाणे काम करत आहेत. जनतेला बँकिंगची सेवा देत आहेत. अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या झोनल मॅनेजर यांनी सर्व बँकांमधील कर्मचार्यांच्या लसीकरणाची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीनुसार त्वरित लक्ष देऊन लसीकरण करावे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
यासंदर्भात अनिकेत पटवर्धन यांनी सांगितले, बँकांमधील कर्मचारी हे पहिल्या फळीतील कोरोना योद्धा आहेत. सध्या लसीकरण केंद्रावरही लस घेण्यासाठी गर्दी असते, मग बँकेतील कर्मचारी लस कशी घेणार? लसीकरण केंद्रावर त्यांना नियमित रांगेत उभे राहून लस घेतली तर खूप वेळ लागेल. मग बँकेत अडचण निर्माण होईल. त्यामुळे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष घालावे आणि बँकेतील कर्मचार्यांसाठी त्वरित लसीकरण राबवावे, अशी मागणी केल्याचे अनिकेत पटवर्धन यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com