गोव्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करताना ई-पास आवश्यक,सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी शासनाने ई-पास सक्तीचा केला
गोव्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करताना ई-पास सक्तीचा केला आहे. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करताना बांदा-सटमटवाडी येथील तपासणी नाक्यावर थांबवण्यात येत आहे. गोव्यातून सिंधुदुर्गात प्रवेश मिळवण्यासाठी अनेक प्रवासी ऑनलाईन ई-पास काढण्यासाठी धावपळ करत आहेत. आजपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी शासनाने ई-पास सक्तीचा केला आहे. सीमेवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर याची कडक अंमलबजावणी सुरु आहे. ई-पास नसलेल्या वाहनधारकांना सीमेवर थांबवण्यात येत आहे. पास असलेल्या वाहनचालकाना प्रवेश देण्यात येत आहे.
www.konkantoday.com