साहित्यिक चळवळीतून साहित्यिक ,पुस्तके गायब –पंढरीच विठ्ठल नाही

0
68

देशातील विद्यार्थ्यांच्या हातात कोणती पुस्तके आहेत व ओठावर कोणती गाणी आहेत यावर राष्ट्राच्या संस्कृतीचा स्तर ओळखता येतो. वाचनामुळे आयुष्यात दिशा व अस्तित्व प्राप्त येतो. पुस्तकांच बोट धरुन जाणिवांच्या लख्ख प्रदेशात नेणारा प्रवास निश्चितपणे आनंददायी असतो.
शब्दाला आकार, रुप, गंध, अस्तित्व सार काही असत. आपण शब्दावर प्रेम करायला शिकल पाहिजे. शब्दानेच आयुष्य संस्कारीत होईल. शब्द जगण्याचा विश्वास देतात. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागून त्यांच्यामधील सृजनशिलता वाढली पाहिजे. ब्रिटीश लायब्ररीप्रमाणे जर आपल्या ग्रंथालयासमोर वाचकांची रांग लागली तर ग्रंथ प्रसाराच्या दृष्टीने तो दिवस सुदीन ठरेल.                                                                  साहित्यिक चळवळीतून साहित्यिक ,त्यांचे  लिखाण ,त्यांची पुस्तके गायब झाली आहेत . बाकी सर्व काही आहे ,पुस्तकाशी त्याना काही घेणदेण नाही . पंढरीच विठ्ठल नाही . हे कटू वास्तव आहे .विद्यार्थ्यांमधील वाचन संस्कृती संवर्धनासाठी ग्रंथ दिनानिमित्त ‘वाचू आनंदे’ सारखी चळवळ सशक्त होण्याची गरज आहे.

  • ‘द होली बायबल’, कोटेशन्स फ्रॉम चेअरमन माओ त्से तुंग व हॅरी पॉटर जगात सर्वात जास्त वाचली जाणारी तीन पुस्तके आहेत.
  • अमेरिकेत हॅरी पॉटरशी संबंधित पुस्तकावर सगळ्यात जास्त वेळा बंदी घालण्यात आली.
    ‘* बराक ओबामांचे एं प्रॉमिस लँड हे पुस्तक जगभर गाजते आहे फिफ्टी शेडस ऑफ ग्रे’ हे जगातील सर्वात जास्त खपाचे पुस्तक आहे
  • सगळ्यात महागडे पुस्तक खरेदी करणारी व्यक्ती म्हणजे बिल गेटस्. The codex Leicester अस पुस्तकाच नाव , याची किंमत ३ कोटी ८० लाख डॉलर.
          म. गांधीना पत्रकाराने प्रश्न विचारला , शांततेचा मार्ग कोणता ? मं गांधीनी हसून सांगितले , शांति हाच मार्ग आहे .त्याचप्रमाणे वाचन संस्कृतिसाठी
             * आधी वाचलेच पाहीजे *

अँड विलास पाटणे — 23 एप्रिल जागतिक ग्रंथ दिवस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here