कृषी विद्यापीठातील अधिकारी व प्राध्यापकांचा तपासणी न करता जिल्हयाबाहेर प्रवास -कृषी विद्यापीठ प्रशासनाला तातडीने पत्र देण्याचे नामदार उदय सामंत यांचे आदेश
दापोली – जिल्ह्यात कडक लॉक डाऊन जिल्ह्याबाहेरून प्रवेश करणाऱ्यांची अँटीजेन टेस्ट, चौकशी आदी सोपस्कार करून यावे लागते आहे.मात्र असे असतानाही येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील काही उच्चपदस्थ अधिकारी,प्राध्यापक मात्र दर आठवड्याला सुट्टीच्या दिवशी मुंबई, पूणे वारी करुन येत असतात ही बाब येथील पत्रकारांनी ना.उदय सामंत यांच्या लक्षात आणून दिल्यावर या सगळ्याची गंभीर दखल घेत यासंदर्भात कृषी विद्यापीठ प्रशासनाला तात्काळ पत्र दया असे आदेश मंत्र्यांनी दापोली प्रांताधिकारी शरद पवार यांना दिले आहेत. मंगळवारी दापोली दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषदेत ना.सामंत बोलत होते. येथील काही अधिकारी शुक्रवारी दुपारीननंतर निघुन शनिवारी व रविवारी सुट्टी लक्षात घेऊन मुंबई, पूणे दौरे फॅमिली भेटीसाठी करत असतात. आपले ओळकखपत्र वापरून जर दर आठवड्याला कृषी विद्यापीठ अधिकारी जर मुंबई पूणे वारी करत असतील तर ते चुकीचेच असून यावर अंकुश ठेवावा लागेल असे स्पष्ट मत ना.सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. कृषी विद्यापीठ मध्ये काही कर्मचारी, प्राध्यापक पॉझिटिव्ह आले असुन या सगळ्या पार्श्वभूमीवर आठवड्याला शनिवारी, रविवारी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या फॅमिली भेट दौऱ्यावर आता अंकुश ठेवण्याचे निर्देश ना.उदय सामंत यांनी दापोली तालुका प्रशासनाला दिले आहेत.
www.konkantoday.com