
मुंबईसह ठाणे, मध्ये यलो! तर कोकण सह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट!!
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज राज्यातील काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज संपूर्ण कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच मुंबईसह ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये पावासचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरबोर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं आज कोकणसह मध्य महाराष्ट्रमुंबई आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.