जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी च्या वतीने कोविड रुग्णांच्या नातेवाइकांना मोफत भोजन देऊन जपली सामाजिक बांधिलकी

0
44

रत्नागिरी जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी च्या वतीने रत्नागिरी येथील महिला कोविड रुग्णालय येथे गरजू नातेवाईकांचे साठी मोफत भोजन व्यवस्था करणेत आली. लॉक डाऊन चे कालावधीत सर्वच हॉटेल्स बंद असल्याने, जिल्हा भरातून महीला रुग्णालयात येणाऱ्या अतिगंभिर रुग्णाचे नातेवाईकांना जेवणाची अत्यंत अवघड अवस्था होऊन गेली होती. या बाबत पतसंस्थेचे चेअरमन परशुराम निवेंडकर याना या बाबत काही आरोग्य व्यवस्थेतील मंडळींनी कल्पना दिली व आपण पतसंस्थे मार्फत मदत करावी असे आवाहन केले होते. त्या प्रमाणे निवेंडकर यांनी पतसंस्थेतील सहकारी संचालकांना याची कल्पना दिली. आपल्याला मिळालेली माहिती खरंच वस्तुस्थितीजन्य होती आणि अनेक नातेवाईकांना लॉकडाऊन मुळे दोन वेळेचे जेवण मिळत नसल्याने, ती गैरसोय थोडे दिवस का होईना आपण दूर करू असा विश्वास संचालकांनी दाखविला आणि मग सुत्र लगेच हलली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ फुले मॅडम याना भेटून पतसंस्थेमार्फत भोजनाची व्यवस्था मोफत करत आहोत याची कल्पना देण्यात आली. त्यांनीही या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. दिनांक १८ एप्रिल रोजी मा. डॉ. फुले मॅडम यांचे उपस्थितीत या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात करणेत आली. रात्री 8 ते 9 या वेळेत जवळपास ६० गरजू नातेवाईकांना मोफत भोजन वाटप करणेत आले असे चेअरमन श्री परशुराम निवेंडकर यांनी सांगितले या साठी माजी चेअरमन श्री. नितीन तांबे यांनी सकाळपासून तयारी केली होती. तसेच माजी चेअरमन राजेंद्र रेळेकर,श्री.दिनेश सिनकर, कर्मचारी नेते राजेंद्र जाधव , अभय लाड, निलेश गिम्हवणेकर आणि पतसंस्था कर्मचारी संजय साळवी, वीरेंद्र कांबळे, सिध्देश कदम यांनी उपस्थित राहून सदर भोजन वाटपाचे उत्तम नियोजन केले.
wwe.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here