“मला जर करोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोडांत कोंबले असते – शिवसेना खासदार संजय गायकवाड यांचे वादग्रस्त विधान

0
36

एकीकडे महाविकास आघाडीचे नेते केंद्रावर आरोप करीत असतानाच भाजपा नेते ठाकरे सरकार अपयशी ठरल्याची टीका करत आहेत. वादग्रस्त वक्तव्यांची सध्या मालिका सुरु असताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी वाद निर्माण करणारं वक्तव्य केलं आहे.मोदी सरकार, फडणवीसांना लाज वाटली पाहिजे. फडणवीस मुख्यमंत्री असते तर नरेंद्र मोदींनी काय केलं असतं? चंद्रकांत पाटील मंत्री असते तर काय केलं असतं? राज्यातील मंत्री जीव तोडून नियोजन करत असताना मदत करायची सोडून राजकारण करत आहेत, खिल्ली उडवतात. हे सरकार अपयशी होईल हे पाहतात. पण यामध्ये लाखो लोक मरतील त्याचं काय?,” अशी विचारणा संजय गायकवाड यांनी केली आहे.
“मला जर करोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोडांत कोंबले असते, इतका तिरस्कार या लोकांबद्दल निर्माण झाला आहे. म्हणून राजकारण न करता राज्याला मदत केली पाहिजे. आधी महाराष्ट्र जगला पाहिजे, नंतर राजकारण आहे. माणसंच मेली तर कोण मतदान करणार आहे तुम्हाला,” असं शेवटी ते म्हणाले आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here