जि.प मुख्याधिकारी डॉ. इंदुराणी जाखड,यांनी रेल्वे स्टेशनला भेट देऊन सर्व प्रवाशांच्या कोव्हीड तपासणीच्या नियोजनाबाबत आढावा घेतला

0
63

आज रत्नागिरी रेल्वे स्थानकाला प्रत्यक्ष भेट देऊन कोकण रेल्वेने रत्नागिरी येथे येणाऱ्या सर्व प्रवाशांच्या कोव्हीड तपासणीच्या नियोजनाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी डॉ. इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. श्री. उदयजी बने सो, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद रत्नागिरी व प्रादेशिक व्यवस्थापक, कोकण रेल्वे हे उपस्थित होते.
प्रादेशिक व्यवस्थापक, कोकण रेल्वे यांचेकडून कोकण रेल्वेने रत्नागिरी येथे येणाऱ्या/ उतरणाऱ्या प्रवाश्यांच्या संख्येबाबतची माहिती आरोग्य विभाग व पोलीस यंत्रणेकडे प्राप्त करून घेतली जाणार असून सदर सर्व प्रवाशांची कोव्हीड तपासणी रत्नागिरी रेल्वे स्थानकामध्येच करण्यात येणार आहे. रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार तपासणी पथकांची संख्या वाढविली जाणार आहे.
त्यासाठी 3 कर्मचाऱ्यांच्या पथकाची ज्यामध्ये एक आरोग्य कर्मचारी व 2 इतर कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली असून सदर पथक रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे 24 X 7 कार्यरत असणार आहे. सदर प्रवाशांपैकी जे प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह असतील त्यांना पुढील उपचारांसाठी कोव्हीड केअर सेंटर मध्ये संदर्भित करण्यात येणार असून उर्वरित प्रवाशांना गृह विलगिकरणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी दिली आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here