अनधिकृत कोव्हिड केअर सेंटर चालविणाऱ्या एसएमएस च्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करा- आमदार योगेश कदम यांची मागणी

खेड :शासनाची कोणतीही परवानगी न घेता कोव्हिड केअर सेंटर सुरु करून कोव्हिड रुग्णांवर उपचार करणे हा कायद्याने गुन्हा असल्याने भरणे नाका येथील एसएमएस रुग्णालयाच्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे केली आहे.
खेड तालुक्यातील भरणे नाका येथे असलेल्या एसएमएस या रुग्णालयात अनिधिकृत कोव्हिड केअर सेंटर सुरु करून डॉ. परमेश्वर गौंड यांने कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यास सुरवात केली आहे. या ठिकाणी अनेक कोरोनाबाधित रुग्ण दाखल असून एक दोन महिलांचा मृत्यूही ओढवला आहे .
खरतर ही गंबीर बाब तालुका प्रशासन , तालुका आरोग्य यंत्रणा आणि भरणे ग्रामपंचायत यांच्या लक्षात यायला हवी होती. मात्र याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. (लक्ष नव्हते की जाणुनबुजुन दिले जात नव्हते हा संसोधनाचा विषय आहे.) खेड तालुक्यातील प्रसारमाध्यमांच्या हे निदर्शनास आल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी हा गंभीर प्रकार उघडकीस आणला. तालुका आरोग्य यंत्रणा आणि तालुका प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. माध्यमातून वृत प्रसिद्ध झाल्यावर प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने तसेच तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. राजन शेळके यांनी एसएमएस रुग्णालयात जावून परिस्थितीची पाहणी केली. परवानगी शिवाय कोव्हिड केअर सेंटर चालविणे म्हणजे रुग्णांच्या जिवाशी खेळण्यासारखे असल्याने प्रशासनाने तात्काळ हे कोव्हिड केअर सेंटर बंद करुन संबधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करणे गरजेचे होते. मात्र गुन्हा दाखल करणे लांबच उलटपक्षी प्रशासनच माध्यम प्रतिनिधींना प्रशासन आणि डॉक्टरला सहकार्य करण्याचे सल्ले देत आहेत.दरम्यान हा सारा प्रकार माध्यमाच्या प्रतिनिधींनी दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांच्या कानावर घालताच आमदार योगेश कदम यांनी या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी संपर्क साधत संबधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आमदार योगेश कदम याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे समजते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button