चिपळूण शहरात आजपासून मोबाईल कोरोना टेस्टिंग सेंटर सुरू
चिपळूण शहरात विविध ठिकाणी आज १४ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या मोबाईल कोरोना टेस्टिंग सेंटर सुरू होत असून, या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन येथील नगरपरिषदेचे आरोग्य सभापती तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य शशिकांत मोदी यांनी केले आहे.
शहरातील विविध भागांत जनतेच्या सोयीसाठी मोबाइल कोरोना टेस्टिंग सेंटर बुधवारपासून सुरू होणार आहे. सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत ही मोहीम शहरात सुरू राहणार आहे. यात आरटीपीसीआर आणि अँटिजन या दोन्ही टेस्ट मोफत होणार आहेत. नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाहीत, अशी माहिती मोदी यांनी दिली.
www.konkantoday.com