
पाटबंधारे आणि लघुपाटबंधारे विभागाच्या ६८ धरणांपैकी २८ धरणे १०० टक्के भरली
जिल्ह्यातील पाटबंधारे आणि लघुपाटबंधारे विभागाच्या ६८ धरणांपैकी २८ धरणे १०० टक्के भरल्यामुळे आता सांडव्यांवरून ओसंडून वाहू लागली आहेत. चिपळूण आणि लांजा तालुक्यातील ६ धरणे, राजापूरमधील ५ खेड तालुक्यातील ३ तर गुहागर, मंडणगड, संगमेश्वर आणि रत्नागिरीमधील १ धरण आता तुडुंब भरून वाहू लागली आहेत. पुढे दोन दिवस पावसाचे प्रमाण वाढल्यास अन्य आठ धरणेही लवकरच १०० टक्के भरतील असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येत आहे.www.konkantoday.com