
रत्नागिरी शहरातील किराणा व्यापा र्यांवर लुटण्याच्या उद्देशाने हल्ला, एक जण जखमी
रत्नागिरी शहरातील चर्च रोड येथे दोघा व्यापाऱ्यांवर अज्ञातांनी पैसे लुटण्याच्या दृष्टीने हल्ला केल्याची घटना घडली आहे . काल रात्री ९ वाजता चर्च रोड येथे ही घटना घडली .
रमीझ हजीहबीब आकवानी (वय 32. रा. माजगाव ) किराणा माल व्यापारी व भाऊ वसीम या दोघांवर प्राणघातक हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न झाला. हे दोघेही काल रात्री ९ च्या सुमारास जुने भाजी मार्केट येथील आपले किरणामालाचे दुकान बंद करून आपल्या माजगाव रोड येथील घरी दुचाकीवरून जात असताना ही घटना घडली.चर्च रोड येथील गतिरोधक जवळ दुचाकी आली असता पाठ करून उभ्या असणाऱ्या दोन अनोळखी व्यक्तीने अचानक या दोघांवर दांडक्याने हल्ला केला व हातातली पैशाची बॅग पाळवण्याचा प्रयत्न केला.या हल्ल्यात भाऊ वसीम जखमी झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबतची तक्रार पोलीस स्थानकात नोंदवण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
www.konkantoday.com