
महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाब ही तीन राज्ये अपयशी असल्याचे केंद्राचे म्हणणं असेल तर हे केंद्राचंच अपयश -शिवसेनेचे खासदार संजय राऊत
राज्यात गेले काही दिवसांपासून लसीकरणाच्या मुद्द्यावरून केंद्र विरूद्ध राज्य सरकार असा संघर्ष सुरू आहे. केंद्रातील सरकार सध्या राज्यावर टीका करत आहे. तर ठाकरे सरकारमधील नेते केंद्र सरकारवर टीका करताना दिसत आहेत. या मुद्द्यावरून आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपलं प्रखर मत मांडलं. “केंद्रातील सरकारने राज्यावर केलेले आरोप म्हणजे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे हे कारस्थान आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाब ही तीन राज्ये अपयशी असल्याचे केंद्राचे म्हणणं असेल तर हे केंद्राचंच अपयश आहे. कारण मोदी यांच्या नेतृत्वाखाली धोरणाची ही लढाई लढली गेली आहे. मोदी यांच्या प्रत्येक सूचनेचे पालन आपलं राज्य सरकार करत आहे.
www.konkantoday.com