
थकबाकीदारांविरूद्ध चिपळूण नगर परिषद आक्रमक, आजपासून जप्तीची कारवाई
चिपळूण नगर परिषद १२ मार्चपासून थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यास सुरूवात करणार आहे. नळ कनेक्शनही खंडीत केली जाणार असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आवश्यक तेथे पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे.आर्थिक वर्ष संपत असल्याने नगर परिषदेने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा वेग वाढवला आहे. नगर परिषदेला मालमत्ता करातून चालू व थकित मिळून सुमारे १५ कोटी ३९ लाख २७ हजार ५८३ रुपये तर पाणीपट्टी करातून चालू वर्षी मागील थकबाकी मिळून सुमारे २ कोटी ४५ लाख ८८ हजार १३३ रुपये येणे अपेक्षित आहे. त्यापैकी आतापर्यंत ५० टक्के वसुली झाली आहे. मात्र नगर परिषदेला शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून घ्यायचा असल्यास वसुलीही त्याच पटीत होणे गरजेचे आहे. त्यामुळे उर्वरित ५० टक्के वसुली करण्यासाठी मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी काही उपाय योजले आहेत. www.konkantoday.com