
राजहंस प्रकाशन संस्थेच्या सहयोगातून रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात पुस्तक विक्री केंद्राचा रविवार दि.१५ ऑक्टोबर रोजी शुभारंभ
दि.१५ ऑक्टोबर पासून नवरात्र हा सरस्वती म्हणजे विद्येच्या देवतेचा उत्सव सुरू होत आहे. तसेच दि.१५ ऑक्टोबर हा “वाचक प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य राखत पुस्तक विक्री केंद्राचा शुभारंभ रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात सकाळी ११.०० वाजता करत आहोत.
राजहंस प्रकाशन संस्थेचे सहकार्य
राजहंस प्रकाशन या प्रसिद्ध संस्थेने आपली पुस्तके या विक्री केंद्रावर सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी वाचनालयात राजहंसने प्रकाशित केलेली पुस्तके उपलब्ध करून देण्याचे मान्य केले असून प्रारंभी विविध प्रकारची १६० पुस्तके रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ही सर्व पुस्तके भरीव सवलतीसह विक्रीसाठी या केंद्रावर उपलब्ध असतील.
अन्य प्रकाशन संस्था ही सहभाही होतील
राजहंस प्रमाणेच अन्य प्रकाशन संस्थांना संपर्क करून त्या सर्वांची पुस्तके रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीत आहोत. लवकरच राजहंस बरोबर अन्य प्रसिद्ध प्रकाशनांची पुस्तके वाचनालयात उपलब्ध होतील.
पुस्तक विक्री दालन उपलब्ध नसल्याची त्रुटी भरून निघेल
रत्नागिरी हे सुसंस्कृत शहर म्हणून प्रसिद्ध आहे. वाचनालयातही मोठी वाचक संख्या आहे. मात्र तरीही रत्नागिरी शहरात एकही पुस्तकाचे भव्य दुकान उपलब्ध नाही ही वाचकांसाठी खूप क्लेशदायक गोष्ट होती. मात्र आता रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात भरपूर पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि ग्रंथप्रेमी आपल्या आवडीची पुस्तके हाताळून निरीक्षण करून ही पुस्तके सवलतीचे दरात खरेदी करू शकणार आहेत. रत्नागिरीमध्ये या पुस्तक विक्री केंद्राचे माध्यमातून हे नवे पुस्तक दालन वाचक प्रेमींसाठी उपलब्ध होणार आहे.
शुभारंभपुस्तक प्रेमींच्या उपस्थितीत*
या पुस्तक विक्री केंद्राचा शुभारंभ दि.१५ ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी ११.०० वाजता होणार आहे. यावेळी पुस्तक प्रेमींनी आवर्जून उपस्थित राहून आपल्या पुस्तक खरेदीचा शुभारंभ नवरात्र व वाचक प्रेरणा दिनाचे औचित्य साधून करावा असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
www.konkantoday.com