
डॉ.उदय निरगुडकर हिंदुस्थानच्या पुढील २५ वर्षाचा प्रवास उलगडणाररत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात डॉ.उदय निरगुडकर यांचे व्याख्यान
प्रसिद्ध व्याख्याते, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक डॉ.उदय निरगुडकर यांचे भारत @ 47 या विषयावर व्याख्यान होणार आहे. रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या सभागृहात शनिवार दि.४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता डॉ.उदय निरगुडकर हे अमृत काळातील वाटचालीचा मागोवा घेत भारत @ 47 म्हणजे स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्धापनदिनी भारताचे चित्र कसे असेल ? इथले अर्थ जगत, इथला विकास, इथले तंत्रज्ञान, राजकीय स्थिती, भौगोलिक सीमा, शैक्षणिक उपलब्धी, औद्योगिक विकास, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे स्थान, इथल्या लोकशाही कार्यपद्धतीचे त्यावेळचे महत्त्व अशा अनेक विषयांचा रोचक आढावा घेत हे @ 47 भारतमातेचे चित्र डॉ.उदय निरगुडकर या व्याख्यानाचे माध्यमातून श्रोत्यांसमोरं मांडणार आहेत.
भारत फार वेगाने प्रगती करत आहे. देशाची अर्थव्यवस्था अग्रस्थानाकडे झेपावत आहे. पायाभूत सुविधा विकसित झाल्या आहेत. भारताची बाजारपेठ हे शक्तिस्थान बनले आहे. दरडोई उत्पन्न वाढते आहे. शेतीकडे विशेष लक्ष दिले जात आहे. अशावेळी सर्वात जास्त युवा वर्ग असलेला भारत हा युवा वयोगटाचा देश म्हणून प्रस्थापित आहे. या पार्श्वभूमीचे रोचक अभ्यासपूर्ण विवेचन आपल्या सिद्ध वाणीच्या माध्यमातून श्रोत्यांसमोर मांडणार आहेत.
या व्याख्यानाला (भारत @ 47) रत्नागिरीतील रसिकांनी, युवा वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून भारत @ 47 चे चित्र जाणून घ्याव असे आवाहन रत्नागिरी नगर वाचनालयाचे अध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
www.konkantoday.com