रत्नागिरी जिल्ह्यातही लसीची टंचाई ,चिपळूण तालुक्यांतील लसीकरण केंद्र बंद
एकीकडे रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच जिल्हा प्रशासकीय पातळीवर लसीकरणाची मोहीम राबवण्यात आली होती त्याला नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत होता सध्या राज्यातही कोरोना वरील लसीचा तुटवडा झाला आहे त्याचा फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला आहे रत्नागिरी जिह्यातील लस शनिवारपर्यंत पुरेल असा अंदाज उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला होता मात्र आता जिल्ह्यात लसीची टंचाई जाणवू लागली आहे जिल्ह्यातील कोव्हिशील्ड लसीचा साठा संपल्याचे कळत आहे दुसरी लस कोव्हॅक्सिनचा काही प्रमाणावर साठा आहे रत्नागिरी येथील झाडगाव केंद्रात काल लसीकरणाचा दुसरा डोस घेण्यासाठी गेलेल्याना लस संपण्याचे सांगण्यात आले त्यामुळे त्यांना लसीकरण न करताच परतावे लागले
सिव्हिल हॉस्पिटलमध्येही काहीजणांना असा अनुभव आला चिपळूण तालुक्यातील साठा संपल्याने काल सायंकाळी चारनंतर लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागली
रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागामार्फत राज्य शासनाकडे १लाख ७०हजार डोसची मागणी करण्यात आली आहे ती वेळेत न मिळाल्यास जिल्ह्यातील लसीकरण मोहीम ठप्प होण्याची शक्यता आहे
www.konkantoday.com