जैतापुरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित, आमदार चषक जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२५-२६

जैतापुरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव जैतापूर, रत्नागिरी येथे दिनांक २६ ते २७ जुलै २०२५ या कालावधीत काझी मल्टीपर्पज हॉल, होली, जैतापूर रत्नागिरी येथे आमदार किरण उर्फ भय्याशेठ सामंत सन्मान आमदार चषक या नावाने रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२५-२६ आयोजित करण्यात आलेली आहे. हि स्पर्धा १ पुरुष एकेरी, २ पुरुष दुहेरी, ३ महिला एकेरी, ४ कुमार गट, ५ कुमारी गट ६ किशोर गट व ७ किशोरी गट अश्या सात गटात खेळवली जाणार आहे या वर्षातील हि दुसरीच स्पर्धा आहे . त्यामुळे खेळाडूंनी २०२५-२६ या वर्षाची रजिस्टेशन फी रुपये ५०/- जिल्हा असोसिएशनकडे जमा करावी. स्पर्धेसाठी प्रवेश फी पुरुष व महिला गटासाठी रुपये १५०/- दुहेरीसाठी रुपये २००/- व लहान गटासाठी रुपये १००/- याप्रमाणे येईल. प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवशक आहे अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करणात येईल. सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका बुधवार दिनांक २३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंतच आपल्या तालुका प्रतिनिधीकडे स्पर्धा शुल्कासहित द्यावात. स्पर्धेत सामना खेळणासाठी खेळाडूने पांढरा रंगाचा टीशर्ट किंवा शर्ट परिधान करणे आवश्यक आहे. मागावून कोणतीही तक्रार एकून घेतली जाणार नाही. या स्पर्धेपासून पुरुष दुहेरी गटाचे सामने चार बोर्डाचे तीन सेट अशा पद्धतीनेच खेळवण्यात येणार आहेत याची सर्व स्पर्धकांनी नोंद घावी.

तालुका प्रतिनिधी खालील प्रमाणे

१ ) गुहागर – श्री प्रदीप परचुरे ( ९४२३०४८२५० )

२ ) रत्नागिरी – श्री विनायक जोशी ( ८३९०३८७४८३ )

३ ) देवरूख – श्री राहुल भस्मे (९६५७६३७६७८ ), श्री मोहन हजारे ( ९४२२०५३९४३)

४ ) चिपळूण – श्री प्रकाश कानिटकर ( ९४०३५६४७८२ ), श्री दीपक वाटेकर (९९७५५४६६२५ )

५ ) संगमेश्वर – श्री मनमोहन बेंडके ( ९१३०३०६५२५ )

६ ) लांजा – श्री मनोज जाधव ( ७६२०११६७३६ )

७ ) खेड – श्री योगेश आपटे ( ९९५३२२२६३१ )

८ ) राजापूर – श्री मनोज सप्रे ( ९४०३७६८३७६ )

९) दापोली – श्री माधव शेट्ये (९२०९७०९७९२)

सदर स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून राष्ट्रीय पंच श्री साई प्रकाश कानीटकर व राज्यस्तरीय पंच श्री सागर कुलकर्णी तसेच स्पर्धा प्रमुख म्हणून श्री एकनाथ पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेणाचे आवाहन जैतापुरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष गिरीश सखाराम करगुटकर, उपाध्यक्ष श्रीकृष्ण राऊत, सचिव राकेश दांडेकर, सहसचिव प्रसाद मांजरेकर, खजिनदार सुनील करगुटकर त्याचप्रमाणे श्री प्रदीप भाटकर (अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन), श्री सुरेंद्र देसाई (उपाध्यक्ष रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन), श्री सुचय अण्णा रेडीज (सल्लागार रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन) , श्री मिलिंद साप्ते (सचिव, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन), श्री नितीन लिमये ( खजिनदार, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ) यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button