कोरोनाच्या उद्रेकामुळे पुण्यातील आरोग्यव्यवस्थेवर मोठा ताण,पुणे जिल्ह्यात केवळ ३७६ ऑक्सिजन बेडस उरले
मुंबईपाठोपाठ राज्यातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या पुण्यात मोठी बिकट परिस्थिती उद्भवली आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे पुण्यातील आरोग्यव्यवस्था तोकडी पडताना दिसत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास पुण्यातील आरोग्ययंत्रणा पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता आहे.
पुण्यात सध्याच्या घडीला रुग्णाला व्हेंटिलेटवर ठेवायचे झाल्यास एकही बेड शिल्लक नाही. तर कोरोनाच्या उपचारात महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या ऑक्सिजन बेडसची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. सध्याच्या घडीला संपूर्ण पुणे जिल्ह्यात केवळ ३७६ ऑक्सिजन बेडस उरले आहेत.
www.konkantoday.com