काजू बोर्ड निर्माण करून काजूला हमीभाव देण्याची काजू उत्पादक शेतकर्यांची मागणी
काजू हे किफायतशीर पीक आहे, त्यामुळे भात शेती ऐवजी काजू शेती केली जावी असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात. मात्र काजूच्या ऐन हंगामात काजूला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कायमच चिंता सतावत आहे. यासाठी काजू बोर्ड निर्माण करून काजूला हमीभाव दिला तर काजू शेती आत्मनिर्भर बनवेल, असे शेतकऱ्यांना वाटते.
काजू पीक आर्थिक फायदा मिळवून देणारे आहे. काजू बोंडे, काजू बी, टरफल, काजू गरावरील टरफल पासून आर्थिक उत्पन्न मिळते. पण यावर छोटे छोटे प्रक्रिया उद्योग नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतो. गोवा राज्यात काजू बोंडावर प्रकिया करून वेगवेगळ्या प्रकारची मद्ये तयार करून काजूला योग्य न्याय मिळवून दिला जातो.केरळ राज्याने काजू बोर्ड निर्माण केले आहे. गोवा सरकारने काजू बी ला हमी भाव दिला. मात्र महाराष्ट्र सरकारने काजू शेतीकडे दुर्लक्ष केला आहे. त्यामुळे काजू बीला हमीभाव मिळावा आणि राज्यात काजू बोर्ड निर्माण करावे. अशी आता मागणी होऊ लागली आहे.
www.konkantoday.com