
मंडणगड तालुक्यातील वाढत्या काेराेना रुग्णांची आमदार योगेश कदम यांनी दखल घेतली
मंंडणगड तालुक्यात एकाच दिवशी १७८ रुग्णांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर आराेग्य यंत्रणाही हादरून गेली आहे. तालुक्यातील वाढत्या रुग्णसंख्येची आमदार याेगेश कदम यांनी दखल घेऊन ग्रामीण रुग्णालयाला शुक्रवारी भेट देत वैद्यकीय अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी काेराेनाचा संसर्ग राेखण्याच्या कार्यवाहीत काेणताही हलगर्जीपणा करू नका, अशा सूचना दिल्या.
www.konkantoday.com




