त्यांना पदवीधरचे आमदार म्हणण्याऐवजी नुसतेच आमदार म्हणायला हवे- महायुतीचे उमेदवार रमेश कीर

मागील बारा वर्ष कोकण पदवीधर मतदार संघात जे आमदार कार्यरत आहेत, त्यांनी पदवीधरांसाठी काही ठोस केलेले नाही. त्यांना पदवीधरचे आमदार म्हणण्याऐवजी नुसतेच आमदार म्हणायला हवे असे आरोप मविआचे उमेदवार रमेश कीर यांनी केले. महाराष्ट्र शासन फक्त जनतेला आश्वासने देत आहे, राज्यात 80 टक्के पदवीधर तरुण बेरोजगार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. पदवीधर आमदारांचे काम हे रस्ते विकास किंवा अन्य विकास कामे करणे नसून, पदवीधर, शिक्षण, बेरोजगार याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पदवीधरांसाठी काहीही ठोस काम डावखरे यांनी केलेले दिसून येत नाही. कोकणात पदवीधर मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे. रोजगारीसाठी अन्य जिल्ह्यात जावे लागत आहे. त्यामुळे शासकीय पातळीवरील भरतीत येथील बेरोजगार तरुणांसाठी वेगळा निकष असणे आवश्यक आहे. येणार्‍या उद्योग व्यवसायांमध्ये स्थानिकांच्या समावेशासाठी वेगळी भूमिका हवी. जुन्या पेन्शनसाठीही आपण आग्रही राहणार असल्याचे रमेश किर यांनी सांगितले.कोकण बोर्ड मागील 13 वर्षात राज्यात प्रथम येत आहे. याठिकाणी गुणवत्ता ठासून भरलेली आहे. परंतु येथील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसह अन्य परीक्षांसाठी पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरात जावे लागते. त्यामुळे कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्यासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा म्हणून प्रयत्न होणे आवश्यक आहे. येथील युवा वर्गाला स्पर्धा परीक्षांचा प्लॅटफॉर्म मिळणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक जिल्हा उद्योग केंद्रांना भेटी देऊन रोजगाराची संधी जास्त मिळावी यासाठी प्रयत्न करणेही गरजेचे असल्याचे मत रमेश किर यांनी व्यक्त केले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button