
मुंबई गोवा महामार्गावर कळंबणी नजीक इको कारला अपघात;रस्त्याचे रेलिंग कारमध्ये घुसले ,अपघातात महिला ठार
खेड : मुंबई गोवा महामार्गावरील कळंबणी नजीक मारुती इको कार ला झालेल्या विचित्र अपघातात एक ८० वर्षीय महिला ठार तर अन्य चारजण जखमी झाले. हा अपघात आज पहाटे ६.३० वाजता घडला.
वाहतूक पोलीस शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई वरळी कोळीवाडा येथे राहणारे राघू गणपत पेडणेकर हे आपल्या ताब्यातील मारुती इको कार घेऊन मुंबईहुन सावर्डे येथे जायला निघाले होते.
पहाटे ६.३० वाजण्याच्या सुमारास त्याची कार कळंबणी नजीक आली आता चालक पेडणेकर यांच्या डोळ्यावर झोप आल्याने त्याचा कारवरील ताबा सुटला आणि भरधाव वेगातील कार रस्त्याच्या कडेला बसवण्यात आलेल्या लोखंडी रेलिंगवर आदळली. ही धडक इतकी जोरदार होती कि लोखंडी रेलिंग तुटून कारमध्ये आरपार घुसली.
या अपघातात कारमधील योनीबाई कृष्णा सावंत (८०) प्रफुल्ल राजाराम मोरे (४८ ) राहणार रोहित सुरेश वडवरकर (३८) प्रकाश जयराम सावंत (६९) परिचय प्रकाश सावंत (३२) सर्व राहणार मुंबई हे जखमी झाले.
अपघाताची खबर मिळताच वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान मदत ग्रुप खेडचे प्रसाद गांधी आणि त्यांचे सहकारीही घटनास्थळी पोहचले, अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान योनीबाई सावंत यांचा मृत्यू झाला.
खेड पोलिसांनी अप[घाटाची नोंद केली असून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
www.konkantoday.com