रत्नागिरी जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ
राज्यात गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर तपमानात वाढ झाली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. आता एप्रिल महिना सुरू होताच यापुढे अधिक तापमानातील वाढ जिल्ह्याला हैराण करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे.
आतापर्यंत रत्नागिरीचे तापमान जास्तीत जास्त ३६ अंश सेल्सिअसपर्यंत जात असे. मात्र, आता त्यात २ ते २.५ अंशांपर्यंत वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटी जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाल्याने या कालावधीत जिल्हावासीयांना उकाड्याने हैराण केले तापमानवाढीचा आंबा पिकांवरही परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे
www.konkantoday.com